NationalUnemploymentDay ट्वीटर वर ट्रेंड करतोय…२१ लाखांहून अधिक ट्वीट…काय आहे जाणून घ्या

न्यूज डेस्क – देशाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. दरवर्षी दोन हजार करोड नोकरी देण्याचे कबूल करणाऱ्या पंतप्रधानांना आजच्या दिवसाची आठवण व्हावी यासाठी tweeter वर#NationalUnemploymentDay त्याच बरोबर #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हे दोन्ही हॅशटॅग ट्रेंड करताहेत.

तर भाजपा मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे.

तर दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला सोशल नेटवर्किंगवर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोदींचा वाढदिवस सुरु झाल्यानंतर रात्री बारानंतर काही तासांमध्ये #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस तसेच आणि #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतामध्ये ट्रेण्ड होऊ लागला आहे. या दोन्ही हॅशटॅगवर २१ लाखांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.

कोरोनाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत.

भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्वासन दिलेलं असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आले आहेत. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस  या हॅशटॅगवर आतापर्यंत सहा लाख ८८ हजार ट्विट करण्यात आले आहेत. तर #NationalUnemploymentDay या हॅशटॅगवर १५ लाख ५० हजार ट्विट करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here