विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सांगली शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहरजिल्हयाच्या वतीनं,आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आलीय. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज ,राष्ट्रवादी युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, पश्चिम महाराष्ट्रविद्यार्थी अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

यावेळी शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव म्हणाले , गेल्या दिड वर्षांपासून देशातील सर्व महाविद्यालयं बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकानं उचललीय. केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावं. अशी मागणी शहरजिल्हाध्यक्ष डॉ. शुभम जाधव यांनी केलीय.

विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचं नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आलीय.

यावेळी युवक शहरजिल्हा उपाध्यक्ष संदीप व्हनमाणे , शहरजिल्हा कार्याध्यक्ष शुभम ठोंबरे , सचिन चव्हाण, ऋषिकेश कांबळे, अमोल पाटील, व्रजेश पडियार, साद राहिमतपुरे , तुषार सरगर, विशाल लालवानी ओंकार सुतार, मोहम्मद गोदड, आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here