विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक, केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण मोहीम राबवण्याची मागणी – शहरजिल्हाध्यक्ष डॉ शुभम जाधव यांची माहिती

सांगली – ज्योती मोरे

गेल्या दिड वर्षांपासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्यानुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे.

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अशी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून मागणी करण्यात आल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष डॉ.शुभम जाधव यांनी दिली आहे.

मोदीजी शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा , विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण राबवा..!

मोदीजी भाषणांचे वशीकरण थांबवा , विद्यार्थ्यांचे लसीकरण राबवा…!

मोदी सरकार आतातरी विचार करा थोडा, विद्यार्थ्यांच्या भविष्यात नका घालू खोडा…!

अशा विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष या मुद्यांकडे वेधले जाणार आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचं नुकसान. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या सूचनेनुसार, राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

हि मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरजिल्हाध्यक्ष मा. संजय बजाज , युवकचे शहरजिल्हाध्यक्ष मा. राहुल पवार व पश्चिम विभागाचे विभागीय अध्यक्ष सुहास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सांगली शहर जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here