मनपा क्षेत्रातील सर्व बुथसह चारशे ठिकाणी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवस…

सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादीचे बुथ कमिट्या सक्षमतेकडे महत्वाचे पाऊल…  

सांगली – ज्योती मोरे

महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांचा वाढदिवस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने,सांगली मिरज कुपवाड महापालिकाक्षेत्रामधील वीस वार्डातील 368 बुथ कमिटीसह सांगली मिरज व कुपवाड शहरातील विविध सामाजिक संघटनांच्यावतीने सुमारे चारशे ठिकाणी केक कापुन पालकमंत्र्यांचा वाढदिवस  साजरा करण्यात आला.

श्री पाटील यांनी बुथ कमिट्या भक्कम करण्याचे आदेश दिल्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. सर्व बुथवर हा कार्यक्रम होणं म्हणजे जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार बुथ कमिट्या सक्षम होण्याचे पाऊल मानले जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगलीमधील कापड पेठ येथे व, युवक राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांनी मीरा हौसिंग सोसायटी सांगली. येथे केक कापुन वाढदिवस साजरा केला व जयंतराव पाटील साहेब यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

प्रदेशाध्यक्ष श्री पाटील यांनी बुथ कमिट्या सक्षम करण्याचे आदेश दिल्यापासुन शहर जिल्हाध्यक्ष श्री बजाज व युवकचे शहर जिल्हाध्यक्ष श्री पवार यांनी हे कामाने अतिशय शिस्तबध्दपणे व नेटाने सुरू केले आहे. सर्व बथ कमिट्या गठीत करण्यात आल्या असुन बुथ कमिटी प्रमुखांसह सदस्यांशी सतत संपर्क सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष श्री पाटील यांच्या माध्यमातुन बुथ कमिट्यांच्या मार्फत विविध शासकीय योजना घरोघरी पोहचवण्यात येत आहेत.

लोकांच्या आरोग्याच्या समस्यांना प्राधान्य देत आरोग्य तपासणीसह लाखो रूपयांच्या वैद्यकीय शस्त्रक्रीया मोफत करून दिल्या जात आहे. शहर जिल्हा राष्ट्रवादी म्हणजे आरोग्य दूतच म्हणून ओळखू लागला आहे अशा भावना नागरिकांना वाढदिवसाच्या निमित्ताने केक  कापताना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादीच्या वतीने बुथ कमिट्यांवर आयोजित कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी आपआपल्या भागातील बुथ कमिट्यांवरील कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here