राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातर्फे पातूर येथे विविध फ्रंटल व सेलची आढावा बैठक संपन्न…

पातूर:-हॉटेल संगम पातूर येथे रविवारी महाराष्ट्र राज्य सेल व फ्रंटल समनव्यक सुहासजी उभे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शहर व तालुका कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सध्या राज्यामध्ये संघटनात्मक बांधणी करण्याकरिता विविध फ्रंटल व सेलचे गठन करण्यात आहे.

या सर्वांच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य सेल व फ्रंटल समनव्यक सुहासजी उभे हे दिनांक ८ मे रोजी पातूर दौऱ्यावर आले होते त्याअनुषंगाने या वेळी सुहासजी उभे यांनी पातूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची समस्य जाणून घेतली व आढावा घेवून योग्य मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष रा का पा चे जिलाध्यक्ष संग्रामभैय्या गांवडे जे होते। यावेळी प्रमुख उपस्थिती मनहून माजी आमदार बळीराम सिरस्कर, प्रा.बिस्मिल्ला खान,शिवा मोहोड, पिंटू वानखडे, व पातूर तालुक्यातील सर्व फ्रंटल सेल चे अध्यक्ष या वेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलखन सर व आभार माजी नगर अध्यक्ष व शहर अध्यक्ष रा का हिदायत खान रूम खान यांनी केले।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here