पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते तथा स्वछ भारत मिशन चे राष्ट्रीय ट्रेनर किशोरकुमार वागदरीकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा…

नांदेड – येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छ भारत मिशनचे राष्ट्रीय ट्रेनर किशोरकुमार वागदरीकर यांचा वाढदिवस कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची बुके अथवा सत्कार न स्वीकारता साजरा करण्यात आला.


सध्या आपल्या देशावर करोना महामारीचे संकट असून देशभरामध्ये दोन लाखावर रुग्ण संख्या झाली आहे. संपूर्ण देश आणि जग या महामारी विरोधात लढत असून देशभरामध्ये चौथ्या टप्प्यातील लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ आणि उद्योगधंदे बंद आहेत. देशभरामध्ये बेरोजगारी आणि उपासमारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे.

त्यातच पश्चिमेला अरबी समुद्रात चक्रीवादळाचा संकट निर्माण झाले आहे. या दोन्ही संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेचे संवेदनशील पत्रकार तथा स्वच्छ भारत मिशन चे राष्ट्रीय ट्रेनर किशोर कुमार वागदरीकर यांनी आज ता. 3 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले.

या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मित्र आणि हितचिंतकांना कोणत्याही प्रकारचे शाल-श्रीफळ बुके अथवा सत्कार समारंभ न करण्याची विनंती केली. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करून घराबाहेर न पडता घरूनच फोन वरून अथवा सोशल मीडियावरून शुभेच्छांचा स्वीकार केला.

Also Read: एक हात मदतीचा…मुंबई एकी ग्रुपतर्फे | २ महीने लॉकडाऊन मधील गरजवंत कलाकार व तंत्रज्ञ यांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप…


येणाऱ्या काळात कोरोना महामार्गाच्या संकटात दरम्यान जास्तीत जास्त गोरगरीब वंचित उपेक्षित लोकांपर्यंत शासकीय योजना आणि सामाजिक प्रबोधन पोहोचवण्याचा अभिनव संकल्प त्यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त केला.

त्याचबरोबर आपल्या मित्र मंडळींना आणि आप्तस्वकीयांना देखील जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. अशाप्रकारे त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here