राष्ट्रीय किसान नेते राकेश टिकैत यांची यवतमाळात सभा होणारच…

आज यवतमाळात आगमन, आझाद मैदानात महामेळाव्याची जय्यत तयारी.

यवतमाळ – सचिन येवले

संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते राकेश टिकेत यांच्या सह राष्ट्रीय शेतकरी नेते आझाद मैदानावर 20 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता किसान महा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या महामेळाव्याची तयारी पुर्ण झाली आहे.

कोरोनाच्या संदर्भाने काही अडचणी असल्या तरी नियमांच्या अधीन राहून ही सभा होणार असल्याने शेतक-यांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे नेते संदीप गिड्डे पाटील तसेच श्रीकांत तराळ यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट असले तरी ठरल्या प्रमाणे वेळेवर यवतमाळ येथील महामेळावा संपन्न होणार आहे. आज संदीप गिड्डे, श्रीकांत तराळ, सिकंदर शहा, बाळासाहेब गावंडे यांनी सभास्थळाची पाहणी केली.

या सभेसाठी देशभरातील मिडीयाचे प्रतिनिधी यवतमाळात येत आहे. याव्यतिरीक्त संयुक्त किसान मोर्चातर्फे या सभेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय किसान मोर्चाचे राकेश टिकैत तसेच अन्य नेते नागपूरहुन वर्धा मार्गे यवतमाळात मेळाव्याला येत आहेत.

या मार्गावर विविध ठिकाणी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी सुध्दा करण्यात आली आहे. सर्वप्रथम सकाळी 10 वा, बुट्टीबोरी येथे स्वागत करुन अंदाजे 100 वाहनांच्या ताफ्या सह खडकी येथे स.10.30 पर्यंत पुढे पवनार येथे स.11.30 वा. धुनीवाले मठ 12 वा, वर्धा बस स्टॅन्ड चौक 12.20 वा. भव्य स्वागत होणार आहे.

त्यानंतर देवळी 12.45 वा. पुढे कळंब येथे यवतमाळ जिल्ह्याच्या स्वागतासह, दु.1.30 वाजता यवतमाळ येथील आझाद मैदानावर आगमन आणि सभा असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यवतमाळ येथील सभेच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी सिकंदर शहा यांच्या संघटनेनी स्विकारली आहे. याशिवाय विविध संघटना आयोजन यशस्वी करण्यासाठी झटत आहे. राकेश टिकैत यांची सभा यशस्वी करण्यासाठी श्रिकांत तराळ, संदीप गिड्डे पाटील, सिकंदर शहा,

महेश पवार, पप्पु पाटील भोयर, मनिष जाशव, पुरुषोत्तम गावंडे, बाळासाहेब गावंडे, डॉ. दिलीप महाले, वर्षाताई निकम, लक्ष्मीकांत लोळगे, प्रशांत भोयर, सतिश काळे, शिवा आडे, निशांत राऊत, घनशाम दरणे, मनिश इसाळकर, विशनसिंग सिध्दू, इकरार अली यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते परीश्रम घेत आहे.

कोरोनाचे नियम पाळणार

कोरोनाच्या संकटामध्ये प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आम्ही काळजी घेणार आहो. याठिकाणी सोशल डिस्टन्स पाळल्या जाईल. परीसर सॅनिटाईज करण्यापासून शेतक-यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असल्याचे संदीप गिड्डे पाटील यांनी सांगीतले. पोलिसांनी सहकार्य केले पाहीजे अन्यथा राकेश टिकैत यांनी जेथे पोलिस अडवतील तेथेच बसून आंदोलन सुरु करणार असल्याचे स्पष्ट केल्याचे श्रीकांत तराळ यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here