किनगांव च्या महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा…

अहमदपूर – बालाजी तोरणे

किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात 11 नोव्हेंबर हा दिवस भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद, महान स्वातंत्र्य सेनानी , ख्यातनाम शिक्षण तज्ञ आणि देशाचे पहिले शिक्षण मंञी यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून अतिउत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ.बी आर बोडके होते तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ भारत भदाडे,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा बालाजी आचार्य गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा प्रभाकर स्वामी प्रा बळीराम पवार ,प्रा संजय जगताप, प्रा विठ्ठल चव्हाण,

प्रा पांडूरंग कांबळे प्रा विष्णू पवार, प्रा अनंत सोमवंशी प्रा बळी कासलवार प्रा अजय फड प्रा विक्रम गायकवाड, प्रा दर्शना कानवटे ,प्रा पद्मजा हगदळे प्रा हुमनाबादे, प्रा अंबादास मुळे प्रा सदाशीव वरवटे, कार्यालयीन अधिक्षक गोपाळ इंद्राळे, उद्धवराव जाधव ,उमेश जाधव, किशन धरणे आदिची होती.

यावेळी प्रा डॉ बी आर बोडके यांनी मौलाना अबूल कलाम यांच्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला आणि सर्वानी विनम्र अभिवादन केले शेवटी आभार प्रा बालाजी आचार्य यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here