नाशिक विशेष पोलिस महानिरिक्षक परिक्षेत्र यांच्या पथकाची रावेर तालुक्यातील सावखेडा येथील जुगार अडयावर धडक कारवाई…

रावेर – श्री.डॉ.प्रतापराव दिघावकर साो विशेष पोलीस महानिरीक्षक,नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परीक्षेत्रातील अवैध धंदे यांचे समुळ उच्चटन करण्यासाठी पथकाची नेमणुक केलेल्या पथकाने दिनांक ०२/१२/२०२० रोजी रात्री ८:३० वाजेचे सुमारास,सावखेडा ता.रावेर जि.जळगाव गावचे शिवारात खिरोदा ते सावखेडा रोडाचे बाजुला असलेल्या हजरत पिर फकरूद्दीन शहा ऊर्फ मिट्ठ शहा हजरत पिर कमालुद्दीन शहा दर्गाचे मागील बाजुस असलेल्या,

सावखेडा ते चिनावल नाल्याचे बाजुला असलेल्या काटेरी झुडपात सार्व जागी जमिनीवर बसुन काही लोक ५२ पत्त्याच्या कॅटमधील अंकावर व चित्रावर पैसे लावुन झत्रा मना नावाचा जुगाराचा खेळ खेळतांना जुगाराच्या अड्यावर छापा टाकला असता तेथे ०९ लोकांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांची नावे पुढील प्रमाणे:-१)प्रविण जगदीश गुरव,वय-३७ वर्षे, व्यवसाय- ड्राव्हिंगस्कुल रा.बुधवार पेठ सावदा ता.रावेर जि.जळगाव,

२)तुषार भरत पाटील वय-३० वर्षे,व्यवसाय- भाजीपाला विक्री,रा.आनंद नगर भुसावळ ता.भुसावळ३)राजेश मधुकर लोखंडे,वय ४४ वर्षे,व्यवसाय व्यपार, रा,आनंदनगर भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव,४)फिरोज रज्जाक तडवी,वय-३२ वर्षे,व्यवसाय- हातम रा.खिरोदा ता.रावेर जि.जळगाव ५) वाहेद जाफर शेख, वय-४५ वर्षे व्यवसाय-फळ विक्रेता,रा. ईस्लामपुरा फैजपुर ता.यावल जि.जळगाव

६)कैलास रुपचंद भोई,वय-४२ वर्षे, व्यववाय-फुटाना विक्रेता,रा.भोईवाडा सावदा ता. रावेर जि जळगाव ७) राहुल रमेश पाटील, वय-३६ वर्ष, व्यवसाय-शेती,रा.राठी गांव कुभारखेडा ता.रावेर जि.जळगाव, ८)महेंद्र नारायण चौधरी, वय-३७ वर्षे,व्यवसाय शेती, रा. राठी गाव कुभारखेडा ता.रावेर जि.जळगाव, ९)साहेबु दगडु तडवी, वय-६१ वर्षे, व्यवसाय शेती,रा.सावखेडा ब्रा ता रावेर जि.जळगाव अशा लोकांना जुगार खेळतांना ताब्यात घेतले असता,

त्यांचे कडुन सुमारे ८०,१५०/- रुपये रोख,१,००,०००/- रुपये किमतीच्या मोटार सायकली, १५५०/- रुपये किमतीचे जुगाराची साधने असा एकुण-१,८१,७००/- रुपये किमतीचा मुद्देमला जप्त करण्यात आला असुन सदर गुन्हया बाबत सावदा पोलीस ठाणे, जि.जळगाव येथे भाग ०६ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर कारवाई,

ही मा.विशेष पोलीस महानिरीक्षक श्री.डॉ.प्रतापराव दिघावकर सो नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरिक्षक- सचिन जाधव,पोलिस उपनिरिक्षक-संदीप पाटील,पोलिस नाईक-नितीन सकपाळ,पो.कॉ- उमाकांत खापरे,विश्वेश हजारे,दिपक ठाकूर,चेतन पाटील,सुरेश टोंगारे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here