Nashik | भरधाव कार झाडावर आदळली…४ तरुण जागीच ठार…१ गंभीर…

फोटो -सौजन्य सोशल मिडिया

नाशिक – मनमाड – येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आढळून झालेल्या भीषण अपघातात 4 तरुण जागीच ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा अक्षरशः चुराडा झाला.

अपघात हा मध्यरात्रीच्या सुमारास झाला असून अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे. अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चौघे जागीच ठार झाले आहेत. तर गाडीमधील पाचवा प्रवासी असणारा अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार आहेत.

मात्र अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळच्या सुमारास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here