रिया चक्रवर्तीच्या घरावर नारकोटिक्स पथकाचा छापा…

फोटो सौजन्य ANI

न्यूज डेस्क – अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी आता ड्रग्स अँगल ने सुरु असून आज नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या पथकाने रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकला आहे. यावेळी मुंबई पोलीसही एनसीबी टीमसोबत रियाच्या घरी पोहोचले आहेत.रियाचा सहकारी सॅम्युअल मिरांडा याच्या घरी एनसीबीची झाडाझडती सुरु आहे.

रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यात झालेल्या ड्रग संभाषणाच्या खुलासेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्स अँगलची चौकशी करण्यासाठी एनसीबीची टीम रियाच्या घराची झाडाझडती घेत आहे.

एनसीबीचे उपसंचालक देखील रियाच्या घरी टीमसह उपस्थित आहेत. अटक केलेल्या ड्रग पेडलर झैदने रिया आणि तिच्या भावाचे नाव घेतले. एनडीपीएस कायद्यांतर्गत शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या घघरी पोहचली असून त्याच्याही घराची झाडाझडती घेण्यात येत असल्याचे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले

एनसीबीने आतापर्यंत चार अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे.

एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड तसंच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणाऱ्या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here