नांदेडकरांनो काळजी घ्या आज ७२ कोरोना बाधितांची भर; ३७ बधितांना औषधोपचानंतर सुट्टी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण मागील दोन दिवसांपासून वाढल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.

आज शनिवार 21 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 72 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 51 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 21 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 37 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या एकुण 1 हजार 851 अहवालापैकी 1 हजार 745 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 19 हजार 921 एवढी झाली असून यातील 18 हजार 869 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 315 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 16 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 543 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 35, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, अकोला 1 असे एकूण 37 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.71 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 25, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर तालुक्यात 7, लोहा 1, बिलोली 1, कंधार 13, नायगाव 1, हिंगोली 1, परभणी 1 असे एकुण 51 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 15, किनवट तालुक्यात 1, कंधार 1, देगलूर 1, हदगाव 3 असे एकुण 21 बाधित आढळले.

जिल्ह्यात 315 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 19, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 43, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 115, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9,

हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 4, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 16, कंधार कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 16, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 3, खाजगी रुग्णालय 36, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, माहूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, हैदराबाद येथे संदर्भित 1, औरंगाबाद येथे संदर्भित 1, लातूर येथे संदर्भित 4 आहेत.

शनिवार 21 नोव्हेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 171, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 80 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 36 हजार 758
निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 12 हजार 143

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 921
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 18 हजार 869
एकूण मृत्यू संख्या- 543

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.71 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-14

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-1 हजार 345
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-315
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-16.

आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here