नांदेड-पनवेल-नांदेड उत्सव विशेष गाडीची मुदत आणखी आठ दिवस वाढविली…

नांदेड – महेंद्र गायकवाड

दक्षिण मध्य रेल्वेने उत्सव काळात प्रवाशांच्या सोयी करिता उत्सव विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. या पैकी काही उत्सव विशेष गाड्या मध्ये प्रवाशी संख्या अत्यंत कमी असल्यामुळे या गाड्या रद्द केल्या असून आत्ता सुरु असलेली गाडी संख्या 07613 / 07614 नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष गाडीला प्रवाशांच्या मागणी वरून आणखी 8 दिवस मुदत वाढ देण्यात आली आहे.

गाडी संख्या 07614 नांदेड-पनवेल : या कार्यालयाने पूर्वी घोषित केल्यानुसार हि गाडी 23 नोव्हेंबर पासून रद्द केली होती.परंतु जनतेच्या मागणीवरून या गाडीची मुदत दिनांक 23 नोवेंबर ते 29 नोवेंबर, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गाडी संख्या 07613 पनवेल ते नांदेड : या कार्यालयाने पूर्वी घोषित केल्यानुसार हि गाडी 24 नोव्हेंबर पासून रद्द केली होती . परंतु जनतेच्या मागणीवरून या गाडीची मुदत दिनांक 24 नोवेंबर ते 30 नोवेंबर, 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.विभागीय रेल्वे व्यवस्थापक, उपिंदर सिंघ यांनी आवाहन केले आहे कि प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here