अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त आष्टीकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदेड महानगरपालिकेत निषेध

महेंद्र गायकवाड
नांदेड
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.प्रवीण श्रीराम आष्टीकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नांदेड महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाचा प्रांगणात केला.

सदर भ्याड हल्ल्याचा निषेध करून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.यावेळी हल्लेखोरावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.आयुक्त लहाने यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना भ्याड हल्ल्या संदर्भात निवेदन दिले.

याप्रसंगी आयुक्त डॉ. सुनील लहाने,अतिरिक्त आयुक्त,गिरीष कदम,उपायुक्त अजितपाल सिंघ संधू,उपायुक्त शुभम क्यातमवार,उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे,मुख्य लेखाधिकारी अश्विनी नराजे,लेखाधिकारी शोभा मुंडे यांच्यासह विभागप्रमुख,अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here