भडगाव – राकेश पाटील
शिक्षणाचे महामेरु भडगाव तालुक्यातील आमडदे येथिल रहिवासी नानासाहेब प्रतापराव हरि पाटील यांचा आज वाढदिवस निमित्ताने, एक शांत, संयमी, हसतमुख व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वांना परिचीत आहेत. भडगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे ते विदयमान चेअरमन आहेत.संस्थेचे एक छोटेसे रोपटे त्याचा आज झालेला विशाल वटवृक्ष बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
व्यक्तिचे मन शुध्द असले की त्या व्यक्तिचा कोणीही शत्रु होवू शकत नाही. सर्वांनाच चांगल्या मनाच्या व्यक्तिशी मैत्री करावीशी वाटते. असे निर्मळ मनाचे व्यक्तिमत्व म्हणजे नानासाहेब. निर्मळ मना बरोबरच सहनशीलता त्यांच्या अगदी रोमारोमात भरलेली दिसते.
म्हणूनच त्यांना निर्मळ मन आणि सहनशीलतेचे धनी म्हंटले जाते .राजकारण आणि समाजकारण यामध्ये अतिशय उत्कृष्ठ कार्य करून त्यांनी आपल्या कामाचा एक आगळावेगळा ठसा जनमाणसात उमटविलेला आहे. अल्पावधीतच एक चांगला लौकीक प्राप्त करुन समाजात एक मानाचे, आदराचे स्थान त्यांनी मिळविलेले आहे.
कुणाचीही मदत करण्याची नेहमीच त्यांची तयारी असते . मागील कालावधीत केरळ पुरग्रस्तांना त्यांनी भरीव स्वरूपाची मदत केलेली होती . आता कोरोना सारख्या भयंकर संकटात देखिल त्यांचा मदतीचा हात सदैव तयारच असतो .सत्ता आणि संपत्तीचा हव्यास त्यांनी कधीच केला नाही.
सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सतत निस्वार्थी काम करणारे नानासाहेब खरच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचीत आहेत .कमी बोलणे आणि सर्वांना आपलेसे करणे हा स्थायी भाव त्यांच्या अंगी असल्यामुळे सर्वांना त्यांचे व्यक्तिमत्व मनापासून भावते.
किसान शिक्षण संस्थेचा वाढता व्याप , राजकारण आणि समाजकारण यातील दगदग सांभाळूनही नानासाहेब सर्वांशी प्रेमाने , हसतमुखपणे वागतात . स्वभावात आत्मीयता आणि आदर असल्यामुळे राग , द्वेष , मत्सर , चिडचिड या गोष्टी त्यांच्या आजुबाजुला अजिबात फिरकत नाही.
१९९८ पासून किसान शिक्षण संस्थेची जबाबदारी नानासाहेबावर सोपविलेली आहे. आजही ती जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहेत . नविन स्वप्न उराशी बाळगून आणि भविष्याचा वेध घेऊन त्यांनी किसान शिक्षण संस्थेत अनेक कायापालट केलेले आहेत. मुलभुत दर्जेदार शिक्षण, संगणकीय प्रणालीचा पुरेपुर वापर, कर्मचारी आणि विदयार्थी हित या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवलेला आहे.
आज किसान शिक्षण संस्थेचा महाकाय वटवृक्ष तयार झालेला आहे . संपूर्ण महाराष्ट्रात किसान शिक्षण संस्थेने आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटविलेला आहे .ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना आपण समाजाचेे काहीतरी देणे लागतो हि वृत्ती अंगाशी बाळगून सर्वांचे हित साधणाऱ्या नानासाहेबांच्या कार्याला आणि भावी वाटचालीला मनापासून सर्वांच्या शुभेच्छा.
लेख लिखाण
राकेश पाटील सर
टि .आर .पाटील विदयालय
वडजी ता .भडगाव.