अन् पुरग्र्स्तांच्या भेटीला आले नाना पटोले…

नास्तिक लांडगे

गोसे धरणातुन होत असलेल्या पाण्याच्या विसर्गाने जिल्ह्य़ात महापुर येवुन हाहाकार माजला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आजचे सर्व नियोजीत दौरे रद्द केले अन् पुरग्र्स्तांच्या भेटीला आले.

जिल्ह्य़ातील वैनगंगा नदीला अचानक पुर आल्यामुळे गोसे धरणात पाण्याचा अचानक वाढला. त्यामुळे गोसे धरणाचे पुर्ण तेहतीस दरवाजे उघडले गेल्याने जिल्ह्यात महापुर आहे. त्याचा जबरदस्त फटका नदीतीरावरील गावांत सोबतच आजुबाजुच्या गावांना सुद्धा बसलेला आहे. अनेक शेतकर्‍यांची पिक भुईसपाट होऊन गेले आणि जमिनीचे भुस्कलन सुद्धा झाल्याने शेतकर्‍यांची पार वाट लागली आहे.

नदीकाठच्या आणि आजुबाजुच्या गावांना पुराचा इतका तडाखा बसला आहे की, एकट्या लाखांदुर तालुक्यातील जवळपास एक हजार नागरीकांना आपले घर सोडावे लागले आहे.याची इतंभुत माहीती साकोली विधानसभा क्षेञाचे आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष लोकनेते नानाभाऊ पटोले यांना मिळताच ते प्रशासना सोबतच पुरग्र्स्तांच्या संपर्कात राहुन परिस्थीवर लक्ष ठेवुन होते. पण संपर्क साधुन समाधान मानेल असे नाना पटोले नव्हे.

म्हणुन आज (दि. ३०) रोजी लोकनेते नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा हे स्वतः परिस्थीती जाणुन घेण्याकरिता आजचा सर्व नियोजीत दौरा रद्द करुन पुरग्र्स्तांच्या भेटीला आले.

गावात पुराचे पाणी असल्याने गावाच्या काही भागात जाणे शक्य होत नसल्याने शेवटी त्यानी नावेचा आधार घेतला पुर परिस्थिती जाणुन घेतली,त्यांचे सांत्वन करुन धिर दिला की, हेही दिवस निघुन जातील. शासन आपल्या पाठीशी आहे घाबरण्याचे कारण नाही. असे बोलुन धिर दिला व शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवुन देण्यात येईल असे आश्वत केले आहे.

यावेळी त्यांच्या दौर्‍यात नायब तहसीलदार पाथोडे, पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, गटनेते रामचंद्र राऊत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, मा. उपसभापती वासुदेव तोडरे, तालुका समन्वयक तथा सरपंच उत्तम भागडकर, महासचिव लेकराम ठाकरे, राजु पालीवाल, निलकंठ पारधी, स्वप्नील ठेंगरी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष जितु सुखदेवे, संजय भोवते,

तुलाराम विठोले, सुभाष खिलवानी, विलास पिलारे, मेहबुब पठाण, फिरोज छवारे, प्रभाकर राऊत, गिरधर भाणारकर, टारजन बुरडे, मिलींद सिव्हगडे, मंगेश भाणारकर, मंगेश राऊत, ऋषी राऊत, रुपेश वझाडे, बबलु राऊत, पोलीस पाटील सुभाष राऊत, रवी बगमारे व अन्य व्यक्ती उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here