सुशांतसिंग राजपूत यांच्या कुटुंबीयांची नाना पाटेकर यांनी घेतली भेट…

डेस्क न्यूज – पाटण्यात सीआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षण केंद्राला नाना पाटेकर भेट देण्यासाठी गेले असता नाना यानी सुशांतच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं भेट घेवून सात्वंन केलं. सुशांतसिंग राजपूत यांच्या दु:खद आणि अचानक निधनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला शब्दाच्या पलीकडे धक्का बसला आहे आणि त्याचे चाहते विस्मयचकित झाले होते.

कुटुंबीयांशी बोलताना नाना पाटेकर भावूक झाले. सुशांतच्या कुटुंबीयांचं सात्वंन करताना पाटेकर म्हणाले, “सुशांतचं जाणं हा आमच्या सगळ्यांसाठी मोठा धक्का होता. तो अतिशय गुणी व उत्तम अभिनेता होता. हा धीर व संयमाचा काळा आहे. सुशांतला नक्कीच न्याय मिळेल,” अशा शब्दात नाना पाटेकर यांनी सुशांतचे वडिलांना धीर दिला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या मृत्यूवरून वेगवेगळे आरोपही करण्यात आले. सध्या मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर आज अभिनेते नाना पाटेकर यांनी सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली. नाना पाटेकर हे पाटण्यात एका कार्यक्रमानिमित्त गेलेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here