मूर्तिजापूर | माजी प्राचार्य नामदेवराव जाधव यांचे कार अपघातात निधन…

मूर्तिजापूर – गेल्या आठवड्यापासून तालुक्यात अपघाताचे सत्र वाढते असून आज १० डिसेंबर रोजी झालेल्या दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर मूर्तिजापूर पासून जवळच असलेल्या लाखपूरी रेल्वे गेट जवळ श्री नामदेवराव जाधव यांचे अपघाती निधन झाले आहे.

मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या लाखपुरी रेल्वे गेट जवळ अपघातात निधन झाले असून ते आज दि 10 तारखेला अकोट वरून लग्न प्रसंगाचा कार्यक्रम करून परत येत असताना संध्याकाळी ठीक 5.30 ला लाखपूरी गावा जवळील रेल्वे गेट जवळ श्री नामदेवराव जाधव यांना इंडीका विष्टा या गाडीने धडक देवून अपघात करून पळून गेले.

तर अपघात करून पळून जाणारे संशयित वाहन अमरावती जिल्ह्यातील आहे. त्यांचा गाडी क्र.MH27 AR 5322 या प्रमाणे असून गाडीचा पहिला मालक संतोष खन्नाडे असे दाखवत आहे. माजी प्राचार्य नामदेवराव जाधव हे दहातोंडा सुनील राठोड महाविद्यालयात प्राचार्य पदावरून निवृत्त झालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here