थीलोरी गावाच्या चारही बाजूच्या सीमेवर नाका बंदी…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत , आरोग्य विभाग सतर्क

दर्यापूर :- किरण होले

अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जात आहे . त्यात राज्य शासनाच्या कडून 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान कडक लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली होती. परंतु संपूर्ण राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता पुन्हा 15 मेपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले आहे .

त्यातच ग्रामीण भागात सुद्धा रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत जात आहे. दर्यापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व आरोग्य यंत्रणा ही ताकदीने कामाला लागली आहे.

व ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पोलिस पाटील ,आरोग्य सेविका ,आशा वर्कर ,यांच्या वतीने गावात जनजागृती करून लोकांना विनाकारण घराबाहेर फिरू नये, मास लावणे ,व सुरक्षित अंतर ठेवले असे संदेश देण्यात येत आहे. मागील वर्षी दर्यापुर तालुक्यातील थीलोरी येथे कोरोना कुराणाने चांगलाच थैमान घातला होता.

परंतु आता ग्रामपंचायत ,आरोग्य यंत्रणा, व महसूल यंत्रणा यांच्यावतीने गावाच्या चारही चारही रस्त्यावर नका बंदी करण्यात आली. व गावांमध्ये जो कोणी प्रवेश करत असेल त्यांची पूर्ण माहिती घेऊन त्याला आत प्रवेश दिला जात आहे व गावातील किराणा दुकान हे सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आले आहे..

व लग्न समारंभ फक्त 25 जणांना उपस्थिती दिल्या जात आहे. त्यामुळेच आज रोजी थीलोरी येथे एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही. व भविष्यात सुद्धा जनतेने अशाच प्रकारे सहकार्य करावे जेणेकरून आपण आपल्या गावामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यशस्वी ठरू शकेल असे आवाहन ग्रामपंचायतचे सरपंच सौ मीना शशांक धर्माळे यांच्या वतीने संपूर्ण गावकऱ्यांना करण्यात आले होते

. नाका-बंदी दरम्यान ग्रामपंचायत सरपंच मीना शशांक धर्माळे ,शशांक धर्माळे, सतीश चुडे, योगेश पावडे, बाळू वाकपंजर, सुरेश वाकपंजर, अमित होले, संतोष पुनसे, अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत सदस्य , तलाठी , कृषी सहाय्यक, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here