वडाम्बा येथे नागपंचमीच्या दिवशी नागराज अवतरले…

देवलापार – पुरूषोत्तम डडमल

श्रावण महिन्यातील पहिला हिंदूंचा सण नागपंचमी आहे.या दिवसाच्या शुभ पर्वावर नागराजाने मंदिरात प्रत्यक्ष येवून भक्तांना दर्शन दिले.वडाम्बा गावात प्राचीन देवीचे मंदिर असून तेथेच नागदेवतेचे सुद्धा मंदिर आहे.

आज नागपंचमी असल्याने मंदिरात पूजन व दर्शन करणारे भक्त येत होते.खूप वेळेपर्यंत नागराज मंदिरातच ठाण मांडून बसले होते.काही गावकऱ्यांनी त्याचे पूजन ही केले. गावकर्यांना नागदेवता मंदिरात अवतरले ही वार्ता माहीत होताच गावातील नागरिकांची गर्दी झाली.कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून परिसरातच सर्पमित्र अभय विट्टीवाले यांना बोलाविण्यात आहे.

सर्पमित्र अभय विटीवाले घटनास्थळी पोहचून त्यांनी सापाला सुरक्षितपणे पकडले.या कामी सर्पमित्र प्रविण धुर्वे,विक्की सैरीसे यांनी सहकार्य केले.सापाला सुरक्षितस्थळी जंगलात सोडण्यात आले.सर्पमित्र अभय विट्टीवाले यांनी आतापर्यंत अनेक सापांना पकडून जीवनदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here