नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली…

न्यूज डेस्क – नागपूर महापालिका आयुक्तपदी असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये सदस्य सचिव या पदावर बदली करण्यात आली आहे.

नागपूर महापालिकेत बदली होण्याआधी तुकाराम मुंढे एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती.

तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे.

अवघ्या महाराष्ट्रात आपल्या कामची प्रती अत्यंत शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची आज पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here