नागपूर | हिंगण्याचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित…लिपीक,तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांवरही कारवाई…

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत मतदार यादीतुन मतदारांचे नावे गहाळ…

शरद नागदेवे

नागपूर- अलिकडे पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकी दरम्यान हिंगणा तहसील अंतर्गत येणाऱ्या डिगडोह ईसासनी जिल्हा परिषद सर्कलमधील मतदान केंद्रावर मतदान यादीतून मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याची आरोप वंचित बहुजन आघाडीने घेतला होता.त्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्यावेळी डीगडोह ईसासनी सर्कल मध्ये अनेक मतदारांची नावे गहाळ झाली होती.नागरिकांनी मतदानाचा वेळेस गोंधळही घातला होता.वंचित बहुजन आघाडीने निवडणूक रद्द करण्याची मागणी केली होती.याप्रकरणी निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी गंभीर दखल घेतली.या प्रकरणी हिंगण्याचे तहसीलदार संतोष खांडरे,नायब तहसीलदार संध्या खोडे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले.

तहसिलदारांना निलंबित करण्यात अधीकार विभागीय आयुक्तांकडे असल्याने हे प्रकरण असल्याचे जिल्हाधिकारी विमल.आर यांनी सांगितले.डिगडोह,ईसासनीच्या तीन मतदार केंद्रावर मतदान यंत्र उपलब्ध नसल्याने संबंधित मतदारांना त्यांच्या मतदानातून वंचित राहावे लागेल.२४९४ मतदारांची नावे अंतीम मतदार यादीत समाविष्ट होऊ शकले नाही.

हिंगणा तहसील कार्यालयाकडून नियंत्रण चार्टमध्ये विधानसभेच्या भाग क्रमांक २८२ व २८३ समाविष्ट न केल्यामुळे संबंधित मतदार मतदानापासून वंचित राहीले.घटनेचा तपासात संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची मसूदा, अंतीम मतदार यादी लोकप्रिय होण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतली नाही असे निरीक्षण राज्य निवडणूक आयोगाने नोंदविले आहे.त्यामुळे संबंधितांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करावी असे आदेशही देण्यात आले.

याप्रकरणी विभागीय आयुक्त यांनी संबंधित तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निलंबनाचे आदेश व तसेच याप्रकरणी लिपीक, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विमला आर.यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here