नागपूर पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीत भाजपचा गडाला खिंडार…महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.अभिजीत वंजारी यांचा विजय…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.अभिजीत वंजारी यांचा मोठा विजय झाला.या मतदार संघात गेल्या ५० वर्षांपासून भाजपचे एकछत्री सत्ता होती.अभिजीत वंजारी यांनी या निवडणुकीत भाजपचे उमेदवार,नागपूरचे विद्यमान महापैर संदीप जोशी यांचा पराभव केला.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.अभिजीत वंजारी यांना ६१७०१ मत मीळाली तर भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदीप जोशी यांना ४२९९१ मते मीळाली.महाविकास आघाडीचे उमेदवार अ‍ॅड.अभिजीत वंजारी यांनी संदीप जोशी यांचा १८७१० मतांनी पराभव केला.अभिजीत वंजारी यांचा राजकीय कारकीर्दीमधील हा पहिलाच विजय आहे.यापूर्वी त्यांनी दोन विधानसभा,एक महापालिका, निवडणूक लढवली होती.त्यामध्ये त्यांना अपयश आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here