नागपूर – शरद नागदेवे
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपायनंतर सूध्दा दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत चाललेल्या प्रभावामुळे मनपा आयुक्तांनी शुक्रवारी दहा क्षेत्राला हॉटस्पॉट घोषीत केले आहे.यामध्ये खामला,जयताळा,स्वाल़ंबीनगर, जरीपटका,जाफर नगर,दिंघोरी,अयोध्या नगर,वाठोडा, धरमपेठ,न्यु बीडीपेठ या क्षेत्राचा समावेश आहे.
या क्षेत्रात नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. शुक्रवारी मनपा आयुक्तांनकडून शहरातील व्यापारी प्रतिनिधी सोबत आपात बैठक घेण्यात आली.शहरातील व्यापारीक क्षेत्रात वाढत असलेल्या गर्दीमुळे सतर्कता बाळगण्या बद्दल सांगितले.दुकानात गर्दी होऊ न देणे याबद्दल काळजी घ्यायला हवी.
दुकानात पाच पेक्षा जास्त लोकांना प्रवेश द्यायला नको.या गोष्टींचे उल्लंघन केल्यास एनडीएस पथकाकडून कार्यवाही करण्यात येईल.हॉटल व्यवसायीकांना व कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला.येत्या दहा दिवसांत नियमांचे पालन करण्याबाबत वर्क प्लॅन व्यावसायिकांनाकडून मनपाला देण्याचे आदेश दिले.