शरद नागदेवे
नागपूर – ६० वर्षिय वूद्ध व्यक्तिनी ३ युवकांना नाईट ड्युटीवर जायला सांगितले त्यांनी नकार दिला.वूद्धानी त्यांचा सोबत शिवीगाळ केली.युवक भडकला व त्यानी वूद्धाचा छातीवर वार करुन त्याची निर्घृण हत्या केली.ही घटना एमआयडीसी पोलीस स्टेशन क्षेत्रात काल उशीरा रात्रीं घडली.
प्राप्त माहितीनुसार काल रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन क्षेत्राच्या प्लॉट न.२५३, लोकमान्य नगर निवासी सम्हारु अवधू हरिजन(६० मुळ रहिवासी खुरमाखास, तहसील- रूद्रपूर,जिल्हा-देवरिया, उत्तर प्रदेश)नी त्यांचा सोबत राहणारे मोहम्मदपुर, तहसील – पुहाया,जिल्हा-शहाजहांपूर(उ.प्र.) येथील रहिवासी आरोपी दिनेश कुमार मुन्ना लाल (२३ ),बजरंगी लालचंदप्रसाद गौतम (२१) आणि सुशील कुमार दिपचंद गौतम(१९)यांना गुरवारी ची नाईट ड्युटी वर जायला सांगितले.
दारू पीऊन असल्यामुळे आरोपींची नाईट ड्युटीवर जाण्यासाठी नकार दिला.यावर क्रोधीत सम्हारू नी तीघांना रागावले व शीवीगाळ केली.शीवीगाळ केल्यामुळे चिडलेल्या तिघांही आरोपिंनी सम्हारुला मारपीट केली.आरोपी दिनेशकुमारनी चाकूनी सम्हारूचा छातीवर वार केला.
अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे सम्हारुचा घटनास्थळी मूत्यू झाला.घटनेची माहिती मीळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहचली व सम्हारू ची लाश पोस्टमार्टमला पाठवली.हत्या केलेल्या आरोपिंची पोलीस तपास करीत आहे