नागपुरात १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या !…कारण जाणून थक्क व्हाल…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूरात एका 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण करुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज पांडे असं या मृतक मुलाचं नाव असून घरगुती कारणावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीनं हत्या करुन रिंगरोड परिसरात राज याचा मृतदेह फेकला होता. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.

नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये ही घटना घडली आहे. सुरज शाहू असं आरोपीचं नाव आहे. आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी आरोपी सुरजनं हे पाऊल उचलल्याचं समजतंय. सध्या आरोपी सुरज शाहू एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सुरजनं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास राज याचं अपहरण केलं होतं. खंडणी म्हणून आरोपीनं शोषण करणाऱ्या मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यानं आरोपीनं मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. पोलीस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here