नगर सेवक परिषद मुंबई महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष निवड व सत्कार संपन्न…

पुणे येथे नुकतीच महाराष्ट्र प्रदेश कमिटीवर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांचे अधिवेशन व जिल्हाध्यक्षांचा सत्कार हॉटेल ताज व्हिवांता हींजवडी पुणे येथे पार पडले.
या राज्य मेळाव्यात 24 पुरुष जिल्हाध्यक्ष व 24 महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश होता. महाराष्ट्र राज्यात असलेल्या सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत मधील सन्माननीय नगर सेवक यांच्या न्याय हक्कासाठी “नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र” ची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राम जगदाळे व प्रदेश सरचिटणीस श्री कैलास गोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना राज्यात काम करत आहे.

अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून श्री सुनील महादेवराव पवार व महिला जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीमती ज्योती विजय बाप्पू देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारणी गठीत करणे सुरू आहे.राज्यातील सर्व सन्माननीय नगरसेवकांना योग्य मानधन मिळावे सभागृहात मानसन्मान मिळावा, मुंबई येथे नगरसेवक भवन असावे. स्वतंत्र नगर सेवकांना फंड मिळावा, संपूर्ण जिल्ह्यातील नगरसेवकांना जिल्हा स्तरावर कार्यशाळा आयोजित करावी.

तसेच विभागीय पातळीवर व राज्य पातळीवर वेगवेगळी पुरस्कार नगर सेवकांना देण्यात यावे. वार्ड मध्ये केलेल्या कामांची प्रसिद्धी राज्यामध्ये करणे, आणि सर्वांच्या विचारांची देवाण- घेवाण करणे या साठी संघटना काम करनार आहे. असे मत श्री कैलास गोरे पाटील यांनी आपल्या विचारात मांडले.राज्यातील 24 जिल्हाध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली, व तसेच सत्कार करण्यात आला.

अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील पवार व महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती ज्योती विजयबाप्पू देशमुख, उपजिल्हाध्यक्ष श्री रवि इंगळे, मयुर वहिले, यांचा सुद्धा या राज्य स्तरीय मेळाव्यात सत्कार करण्यात आला, सुनिल पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून संघटनेची गरज लक्षात आणून दिली.श्री डॉ. कैलास गोरे पाटील यांच्या मार्गदर्शनात पुणे महानगर पालिका व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श ग्राम पंचायत “पाटोदा” जिल्हा (औरंगाबाद) आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे (पाटील) येथे कार्य पद्धती व अभ्यास दौरा करण्यात आला…

नगर सेवक परिषद ही संघटना पक्ष विरहीत काम करत राहील कोणत्याही पक्षाचे समर्थन अथवा असमर्थन करणार नाही असे मत अध्यक्ष श्री. राम जगदाळे यांनी व्यक्त केले.
पुढील काळात राज्याचा विभागीय दौरे करण्यात येणार असल्याचे बोलण्यात आले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here