माझे कुटुंब माझी जबाबदारी हा विचार महत्वाचा : बच्चूभाऊ कडू…

अकोला – कुशल भगत

गावोगावी रुग्णवाहिकेची गरजच पडू नये अशी व्यवस्था निर्माण होणे आज गरजेचे असून कोरोणाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे आज राज्यामध्ये सार्वजनिक विचारातून काम झाले पाहिजे जेणेकरून सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी स्वीकारत नियमांचे पालन करून कोरोणाचीही लढाई जिंकने महत्त्वाचे आहे.

परंपरेतून खूप काही करता येतं याच उत्तम उदाहरण आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचे वडील स्मृतीशेष रामकृष्ण आप्पाजी मिटकरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीसाठी रुग्णवाहिका लोकार्पनातून दिसून येते.

आज देशात मंदिरे उभारण्यापेक्षा शाळा अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण कामगार राज्यमंत्री तथा अकोला अकोला जिल्हा पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केले ते स्मृतीशेष रामकृष्ण आप्पाजी मिटकरी पुण्यस्मरनानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश आसोले,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,गोदावरीताई मिटकरी उपस्थित होते.

यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना शहीद हेमंत करकरे विरता पुरस्कार, शिक्षक मुकुंद मोरे व गोपाल मोहे यांना ज्योती-सावित्री पुरस्कार, डॉ.निलेश वानखडे यांना कोविडयोद्धा श्याम राऊत यांना विशेष पुरस्कार तर विशाल बोरे याना डॉ बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पूजा काळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी अमोल काळणे,आर जे गौरव, शाम राऊत, सोपान कुटाळे,शैलेश वानखडे व सहकारी यांनी प्रयत्न केले यावेळी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करन्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here