मूर्तिजापूर | पत्रकारांची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही…गुन्हे त्वरित मागे घ्या.

मूर्तिजापूर प्रतिनिधी

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी आणि दडपशाही सहन केली जाणार नाही.औरंगाबाद येथे दैनिक दिव्यमराठीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून असे गुन्हे दाखल करणे योग्य नसून या घटनेचा मूर्तिजापूर येथील समस्त पत्रकारांनी तीव्र निषेध महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून केला आहे.

औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग बाबत दैनिक दिव्य मराठी’ने सत्य परिस्थिती उजेडात आणून अनेक प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांची दखल न घेता उलट पित्त खवळलेल्या महसूल व पोलीस प्रशासनाने दै.दिव्य मराठी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. त्यामुळे हे कृत्य कदापिही खपवून घेतले जाणार नाही.दमनकारी प्रवृत्तीचा पत्रकारांनी तीव्र निषेध नोंदवला असून सदर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा १५ दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.

यावेळी पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. तसेच काही दिवसांपूर्वी कारंजा येथील पत्रकार अंकुष कडू यांच्यावर यांच्या घरी भ्य्याड हल्ला करण्यात येऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.या घटनेचा देखील पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून कायद्याच्या राज्यात अशा घटना घडणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यामध्ये दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि पत्रकारांना संरक्षण मिळावे अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.

निवेदन देतेवेळी ज्येष्ठ पत्रकार विकास सावरकर, दिलीप देशमुख ,दीपक अग्रवाल, अनिल अग्रवाल,मुन्ना महाजन, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले,संजय उमक, जय प्रकाश रावत,प्रा.दीपक जोशी,प्रा.अविनाश बेलाडकर, निलेश सुखसोहळे,गजानन गवई, बबलू यादव,अथरखान, गौरव अग्रवाल, संतोष माने अंकुश अग्रवाल ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.एल.डी. सरोदे,प्रकाश श्रीवास,उमेश साखरे,नरेंद्र खवले,सोहेल शेख प्रतीक कुर्हेकर,महेश सावळे,बाळासाहेब गणोरकर,सुमित सोनोने आदी पत्रकारांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here