मूर्तिजापूर | दीपकराज डोंगरे यांच्या हत्येचे आरोपी अजूनही मोकाटच…

मुर्तिजापूर तालूक्यातील समशेरपूर येथे दुहेरी हत्याकांड घडलंय. हत्याकांडात धम्मपाल उर्फ आदेश आटोटे याची चाकू आणि कोयत्याने हत्या करण्यात आलीय. तर मारेकरी दिपकराज डोंगरे याचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. काल सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडलीय. दिपकराज यांनी धम्मपाल याच्या गावी जाऊन घरातच हल्ला केलाय. यात धम्मपाल याचा जागीच मृत्यू झालाय.

तर धम्मपालच्या हत्येनंतर गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात दिपकराज गंभीर जखमी झाले होतेय. त्यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मृतक धम्मपाल औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचा सक्रीय कार्यकर्ता होता. तर दिपकराज डोंगरे अॅक्शन फोर्स शिक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होतेय. धम्मपाल उर्फ आदेश याचं दिपकराज मिळालेल्या माहिती नुसार आदेश हा आपल्या नात्यातील लग्नासाठी समशेरपूर येथे आला होताय.

तर दीपक राज हे त्यांच्या दोन साथीदारासह त्यांच्या गावी गेले होते, बाकीचे दोघे पळाले तर काही गावकऱ्यांनी दिपकराज यांना पकडून बेदम मारहाण केली हल्यात गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी जेव्हा मूर्तिजापूर रुग्णालयात आणले असता त्याच्यावर लवकर उपचार केले नसल्याने त्यांना अकोला हलविले असता उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला… या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाहीये…अशी माहिती पोलीस ठाणेदार यांनी दिली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here