मूर्तिजापूर | दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले…एक जागीच ठार तर महिला गंभीर…

नरेंद्र खवले, मूर्तिजापूर :- आज दि ६/०३/२०२१ रोजी धानोरा [वैद्य] येथील रहिवासी सखुबाई नामदेवराव सोनोने आणि महेश सुभाष वानखेडे हे दोघेही काही कामानिमित्त दर्यापूर येथे जात असताना दुपारी २:३० वाजेच्या सुमारास लाखपुरी नजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती कि यामध्ये दुचाकी चालक महेश सुभाष वानखेडे वय ३२ हे जागीच ठार झाले तर सखुबाई नामदेवराव सोनोने वय ७० या गंभीर जखमी झाल्या.

हि माहिती मिळताच वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या टीम त्वरित घटनास्थळी भेट देऊन गंभीर जखमी महिलेस लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.या प्रकरणी पुढील तपास मुर्तीजापूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here