Thursday, November 30, 2023
Homeराज्यमूर्तिजापूर | पुरवठा अधिकारी चैताली यादववर कारवाई होणार...विरवाडा ग्रामस्थांनी उपोषण सोडले...

मूर्तिजापूर | पुरवठा अधिकारी चैताली यादववर कारवाई होणार…विरवाडा ग्रामस्थांनी उपोषण सोडले…

Spread the love

मूर्तिजापूर पुरवठा अधिकारी चैताली यादव यांच्या गैरवर्तन व राशन कार्डच्या समस्या बाबत तालुक्यातील विरवाडा गावातील ग्रामस्थांनी उपोषणाचा पवित्रा हाती घेतला होता, या बाबतीत स्थानिक माध्यमांनी वृत्त प्रसारित करताच जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले असून आज जिल्हा पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देत संपूर्ण प्रकार जाणून घेतला. आणि पुरवठा अधिकारी चैताली यादव दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी काळे यांनी उपोषणकर्त्यांना ग्वाही दिली. या आश्वासना नंतर उपोषण कर्त्यांनी आपले उपोषण ६ व्या दिवशी मागे घेतले.

मूर्तिजापूर पुरवठा विभागा मार्फत विरवाडी या गावातील अंतोदय कार्ड धारकांची संख्या 34 असून मूर्तिजापूर पुरवठा विभाग मार्फत 61 कार्ड बनविण्यात आले, सदर जास्त कार्ड कोणा साठी व कशा साठी बनविले, ज्यांचे घरची परिस्थिती चांगली आहे त्यांना अंतोदयाचे कार्ड कोणत्या नियमाने देण्यात आले, गावातील भूमिहीन तसेच गोरगरीब दिव्यांग बांधवांना अद्याप राशन कार्ड का देण्यात आले नाही, ह्या प्रमुख मागण्या सदर गावकऱ्यांनी रेठुन धरल्या होत्या, जिल्हा पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांच्या वृत्ताची दखल घेत या बाबतीत आंदोलन स्थळी भेट देत येणाऱ्या एक महिन्यात आत या प्रकारणात दोषी असलेल्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


Spread the love
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: