मुर्तिजापुरचा गुटका किंग गजानन अग्रवालच्या दुकानावर शहर पोलिसांची धाड…२.७ लाखांचा मुद्देमाल जप्त…

मुर्तिजापुरचा गुटका किंग म्हणून ओळख असलेल्या गजानन अग्रवाल च्या दुकानावर रात्री शहर पोलिसांची धाड टाकली असून या धाडीत २.७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुर्तिजापुर शहराच्या स्टेशन विभागातील गजानन अग्रवाल हा गेल्या अनेक वर्षापासून गुटका विक्रीचा होलसेल व्यवसायात असलेल्याने त्याची तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर व्यवसाय पसरलेला आहे.

शहर पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले परि.पोउपअधिक्षक अमोल ठाकुर,प्रभारी अधिकारी पो स्टे मुर्तिजापुर शहर यांनी टीमसह रात्री गजानन अशोक अग्रवाल च्या मंगळवार बाजार,सुभाष चौक,स्टे.विभाग असलेल्या ओम जनरल व पानमसाला नावाचे दुकानावर धाड असता दुकानातून आणि घरातून

(१)विमल पानमसाला ८६ पॅकेट प्रत्येकी किमंत अंदाजे १८० रुपये असे एकुन १५,४८० रू (२)९०००गुटखा १३ पॅकेट प्रत्येकी किंमत अंदाजे १९० असे एकुन २४७० रू. (३)नजर गुटखा १२९ पॅकेट प्रत्येकी किंमत अंदाजे २५० असे एकुन ३२,२५० रू (४)सिल्वर गुटखा ६२ पॅकेट प्रत्येकी किंमत अंदाजे १३० असे एकुन ८,०६० रू. (५)करमचंद पानमसाला ३७ पॅकेट प्रत्येकी किंमत अंदाजे ११० असे एकुन ४,०७० रू. (६)काळी बहार पानमसाला ०६ पॅकेट प्रत्येकी किंमत अंदाजे १३० असे एकुन ७८० रू.

(७)पानबहार पानमसाला १२० पॅकेट प्रत्येकी किंमत अंदाजे २१० असे एकुन २५,२०० रू. (८)पानपराग पानमसाला ०९ पॅकेट प्रत्येकी किंमत अंदाजे १४० असे एकुन १,२६०रू. (९)जरूर पानमसाला ०६ मोठे कट्टे व ०२ छोटे कटटे ज्यामध्ये १९०० पॅकेट किंमत अंदाजे १,०४,००० रू. (१०) आर.जे.पानमसाला ०५ मोठे व ०१ छोटा कट्टा ज्यामध्ये १,०५० पॅकेट किंमत अंदाजे ८४,000 रू.असा एकुन २,७७,५७० चा माल जप्त केला असून ३५६/२०२० कलम १८८,२७२,२७३ भादंवी सहकलम २६(२)(४),५९ अन्न सुरक्षा व
मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here