तीन दिवसीय ‘जनता कर्फ्यू’ ला मूर्तिजापूरकरांचा ऊस्फूर्त प्रतिसाद…

नरेंद्र खवले,मूर्तिजापूर

मुर्तीजापुरकरांनी कोरोना वाढत्या रुग्णाच्या संखेला आला बसविण्यासाठी आज पासुन तीन दिवस च्या ‘जनता कर्फ्यू’ चे आयोजन केले असनू ,शहरात आज चांगलाच ऊस्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरात अनेक ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळाला…..

गेल्या महिन्यापासून मुर्तीजापुर शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेदिवस वाढत असून शहरातील रुग्णांची संख्या ३०० च्या जवळपास पोहचली यात शहरातील काही व्यापारी,दुकानदार यांना कोरोनाची लागण झाल्याने येणाऱ्या दिवसात कोरोनाची आणखी मोठा स्फोट होऊ शकतो

व परिस्थिती कधीही आटोक्याबाहेर जाऊ शकते त्याला वेळीच रोखण्यासाठी आता बंद शिवाय दुसरा पर्याय नसल्याने व्यापारी व शहरवासीयांच्या वतीने ५,६,७ या तीन दिवस जनता कर्फू चे आयोजन केले असून आज पुकारलेल्या जनता कर्फ्यूला मुर्तीजापुरकरांनी सकाळ पासूनच उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

शहरातील मुख्यरस्त्यावरील सर्वच प्रतिष्ठाने तर स्टेशन विभागातील शिवाजी चौक,बसस्थानक,अग्रसेन चौक त्याच बरोबर जुनी वस्ती येथील भगतसिंग चौक,महाराजा चौक येथील दुकाने बंद ठेवण्यात आली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here