मूर्तिजापूर | नवीन घरकुल परिसरात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकास अटक…

मूर्तिजापूर – हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकास मूर्तिजापूर शहर पोलिसांनी २१ जानेवारी रोजी अटक करुन त्याच्या कडून लोखंडी तलवार जप्त केली. सदर युवक जुनीवस्ती नवीन घरकुल परिसरात घालत होता धिंगाणा…

नवीन घरकुल परिसरात एक युवक तलवार घेऊन धुमाकूळ घालीत असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या आकाश रामदास अहेरवार (२७) राहणार लक्ष्मी नगर हातगाव हल्ली मुक्काम नवीन घरकुल मूर्तिजापूर याला घेराव घालून त्याच्या कडून शिताफीने तलवार हस्तगत त्याला अटक केली आहे.

आरोपी आकाश अहेरवार याला अटक करून कलम ४,२५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला, ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दिपक इंगळे, नायक पोलीस शिपाई संजय वाघ, पोलीस शिपाई आकाश वाघमारे, सर्वेश कांबे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here