मूर्तिजापूर | विषारी सापाला रेस्क्यू करतांना सापाने घेतला सर्पमित्राच्या बोटाला चावा…

नरेंद्र खवले,मूर्तिजापूर

मूर्तिजापूर येथील सर्पमित्र संजय दोड गेल्या पाच वर्षापासून मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सर्पमित्र म्हणून काम करीत आहे.आतापर्यंत त्यांनी तीन ते चार हजार सापांना जीवदान दिले आहे.

संजय दौड यांना आज नऊ वाजता शेलू वेताळ फोन आला मोहन सरदार यांनी त्यांना फोनवर साप असल्याचे सांगितले व सर्प मित्र संजय दौड तिथे गेले असता,

घोणस नावाचा विषारी साप (रेसर वायफर) तिथे त्यांनी रेस्क्यू केला परंतु रेस्क्यू करतेवेळी डाव्या बोटाला त्याने दंश केला. तरी त्यांनी तो पकडला व आपल्या जिवाची पर्वा न करता रेस्क्यू करून सोडून दिला.

सध्या ते मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे असे येथील डॉक्टर भरणे मॅडम यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here