नरेंद्र खवले, मुर्तिजापूर
अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग ६ वर हेंडज फाट्याजवळ काल रात्रीच्या सुमारास घडली. अपघातात मृत्यू झालेले युवक मूर्तिजापूर तालुक्यातील रंभापुर येथील रहिवाशी मिलिंद अशोक तांबडे वय 27 व बाळासाहेब रमेश निलखंन हे दोघे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
ते 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:00 वाजता दूध विक्रीसाठी मुर्तीजापुर येथे येत असताना 7:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हेंडज फाटा नजीक एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धड़क इतकी जोरात होती कि या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हेंडस फाट्यावरील धडक लागलेल्या बाळासाहेब रमेश निलखन व मिलिंद अशोक तांबडेया दोघांना उत्तरीय तपासणीसाठी वंदेमातरम आपत्कालीन पथकाने तत्काळ लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर येथे आणण्यात आले आहे. अज्ञात वाहनाच्या शोध मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे.