मूर्तिजापूर ते दर्यापूर रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले…एकाचा मृत्यू…तर एक गंभीर

मूर्तिजापूर ते दर्यापूर रस्त्याने जात असलेल्या दुचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने उडविले यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे,जखमीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

मूर्तिजापूर ते दर्यापूर रोडवर रसलपुर या गावाजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला उडविले असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. मंगेश रमेश अखंडे वय वर्ष २३ रा.बोरडा,चिखलधरा येथील रहिवाशी असल्याची माहिती, दुचाकीने जाणारे दोन्ही युवक मूर्तिजापूर वरून बोरडा चिखलदरा येथे जात असताना सायंकाळी ६:५० सुमारास अपघात झाला .

ही माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी वंदे मातरम् आपत्कालीन पथकाच्या संचालक पुंडलिक संगेले यांना माहिती मिळाली. तसेच टीम चे मार्गदर्शक नरेश मुगल अध्यक्ष सेनापती सचिव विक्की गावंडे सोनू चोधरी अक्षय सूर्यवंशी यांनी घटनास्थळी तत्काळ जाऊन मृतक व्यक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात पी एम साठी आणले व अपघातात एक जागीच ठार तर एक जखमी झालेल्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी दवखण्यात दाखल करण्यात आले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here