मूर्तिजापुर | भाजपच्या नगरसेविकेवर आमरण उपोषणाची वेळ…सत्ताधारी पार्टीत असून सुद्धा मिळत आहे सावत्र वागणूक…

मूर्तिजापुर स्टेशन विभाग येथील प्रभाग क्र.८ मधील भाजपच्या नगरसेविका धनश्री भेलोंडे यांनी परीवारासह २६ जानेवारी पासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

मागील अनेक वर्षांपासून मंजूर असलेले विकास कामे होत नसल्याने व विकासकामातुन प्रभागाला हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले. याविषयी अनेकदा नगर परीषद मलेखी निवेदन देवुन व तोंडी सांगुनही विकास कामे होत नसल्याने भाजपाच्या नगरसेविका धनश्री भेलोंडे यांनी सांगितले आहे.

मूर्तिजापूर नगरपरिषद मध्ये भाजपाचे सरकार असून भाजपा नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाच्या विरुद्ध भाजपाच्या नगरसेविका धनश्री भेलोंडे यांनी दंड थोपटले आहे. स्टेशन विभागातील प्रभाग क्र.८ मध्ये मागील अनेक वर्षांपासून विकास कामे झाली नाही. काही कामे मंजूर असुनही ती कामे सुरू केल्या जात नाही.

त्यामुळे नागरीकामधे तिव्र नाराजीचा सुर उमटत आहे. मागील तीन वर्षांपासून एकही विकास कामे झाली नाही. याविषयी अनेकदा निवेदने देऊनही यावर काहीच उपाययोजना केल्या गेल्या नाही. या प्रमुख मागण्यासाठी नगर परिषदे समोर २६ जानेवारी पासून परिवारासह बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मूर्तिजापूर स्टेशन विभागातील राम मंदिर जवळचा नाला गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित होता या नाल्यासाठी निधी १४४७०० मंजूर करून आणला मात्र वर्क ऑर्डर निघाली मात्र कामाची सुरुवात करायला जाणूनबुजून वेळ करीत आहे. तर काही लोक याच श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करीत आहे. असे नगरसेविका धनश्री भेलोंडे यांचे म्हणणे आहे.

प्रभाग क्र.८ स्टेशन विभाग परीसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माणकचंद अग्रवाल यांचे घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण त्वरित सुरू करणे, रस्ता निधीतून मंजूर कामे सुरू करावी, स्टेशन विभागातील पाणी पुरवठा दोन भागात करणे, स्टेशन विभागातील ५१४ नझुल ई क्लास मालमत्ता धारकांची सर्वे करून आखीव पत्रिका तयार करून नियमाकुल करून कच्चा घरांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करावे,

पोळा चौक ते कैलाश अग्रवाल यांचे घरापर्यंत डांबरीकरण त्वरित सुरु करणे, मंजूर झालेल्या राम मंदिर नाल्याचे काम त्वरित सुरू करावे अश्या विविध मागण्यांसाठी येत्या १५ दिवसात कामाला सुरुवात न केल्यास भाजपा नगरसेविका धनश्री शैलेश भेलोंडे आपल्या पती व दोन मुलीसह २६जानेवारी पासून नगरपरिषद कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी नगरविकास मंत्री,खा.संजय धोत्रे,पालकमंत्री बच्चु कडु,जिल्हाधिकारी अकोला,

आमदार हरीष पिंपळे, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद, मोनाली कमलाकर गावंडे नगराध्यक्षा नगर परीषद मूर्तिजापूर यानांही दिल्या आहेत. नगरसेविका धनश्री भेलोंडे हयांना रक्तदाबाचा आजार असुन उपोषणा दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्व नगर परीषद प्रशासन व संबंधीत अधिकारी जवाबदार राहणार असल्याचे ही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here