मूर्तिजापूर | सिरसो दुहेरी हत्याकांडातील तिन्ही आरोपींना २२ पर्यंत पोलीस कोठडी…

फोटो - सांकेतिक

न्यूज डेस्क – मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील प्लाॅट भागात १९ नोव्हेंबरला दुपारी नातेवाईकांच्या भांडणात तिघांवर जीवघेणा हल्ला होऊन पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना साेमवार २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सिरसो येथील सिरसो प्लाॅटमध्ये राहणाऱ्या व परस्परांचे नातेवाईक असणाऱ्या दोन कुटुंबात बऱ्याच दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. शुक्रवारी, १९ नोव्हेंबरला दुपारी क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये ईश्वर पुरी, सय्यद जाबीर व दोन महिलांनी केलेल्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी ४५ वर्षीय किशोर गिरी यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले होते.

तर इतर दोघांना अकोला येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. अकोला येथे उपचारादरम्यान दुर्गा गिरी यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी वृद्ध महिलेवर अकोला येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेतील आरोपींपैकी ईश्वर पुरी हा फरार असून, इतर तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना साेमवार २२ नाेव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here