मूर्तिजापूर | गाजीपूरचा हा स्पॉट देतोय अपघातला निमंत्रण…या आठवड्यात चार अपघात…

नरेंद्र खवले,मूर्तिजापूर

गाजीपूरचा हा स्पॉट देतोय अपघातला निमंत्रण एकाच ठिकाणी या आठवड्यात चार अपघात…मूर्तिजापूर तालुक्यातील जवळ असलेल्या गाजीपुर रोडवर एकाच ठिकाणी आज पुन्हा अपघात झाला असून या अपघातात ४ जण जखमी झाले असून या आठ दिवसात हा चौथा मोठा अपघात असल्याचे येथील गावकरी सांगत आहे.

मूर्तिजापूर वरून अकोला पळसो मार्गे जात असतांना गाजीपूर ते कौलखेड दरम्यान एका ठिकाणी धोकादायकवळण आहे या वळणावर आतापर्यत या आठवड्यात चार अपघात झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. मूर्तिजापूर कडून येणाऱ्या वाहनाला अत्यंत सावधतेने वाहन चालविण्याची गरज असल्याचे गावकरी सांगतात.

आज मॅझोमो गाडी क्रमांक MH 30 AZ 0509 पलटी झाली अपघातामध्ये ज्योती सुनील पवार ,४० वर्ष बेबि बाई गणेश सोळके, ६० वर्ष,विनोद गणेश सोळंके, ४० वर्ष हे चौघेही जखमी अवस्थेत असतांना वंदे मातरम् आपत्कालीन पथकाचे अध्यक्ष सेनापती भाऊ व सोनू चोधरी यांनी घटनास्थळी जाऊन जखमी झालेल्या व्यक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here