मूर्तिजापूर | विध्यार्थीनींची गळफास घेऊन आत्महत्या !…’हे’ कारण असल्याचा प्राथमिक अंदाज…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले


मूर्तिजापूर येथील जुन्या वस्तीतील संतोष नगरात राहत असलेल्या 22 वर्षीय महाविद्यालयीन विध्यार्थीनीं ने काल दुपारच्या दरम्यान गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. सदर मुलगी शिक्षणाकरिता ग्रामीण भागातून मूर्तिजापूर शहरात भाड्याने खोली घेऊन राहत होती.

प्राप्त माहितीनुसार मूळ निपाना येथे राहत असलेली शारदा उर्फ प्रिया पंजाबराव गावंडे वय 22 हि स्थानिक संतोष नगरात भाड्याने राहत होती आई, भाऊ हे बाहेर गेले असता तिने खोलीतच काल दुपारच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलगी गेल्या तीन दिवसापासून नैराश्यात होती सोबतच तिची तब्बेत बरी नसल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आले होते, सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सिटी पोलीस ठाण्यात सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here