मूर्तिजापूर | गोयंका नगरातील ४५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण…दोन आरोपी अटकेत

मूर्तिजापूर – शहरातील गोयंनका नगर भागात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल केली होती,या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक करण्यात आली.

एका ४५ वर्षीय महिलेस येथील गोयंनका नगर भागात राहणारे आरोपी अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल यांनी सदर महिलेचे अनेक दिवसांपासून लैंगिक शोषण करुन तिच्याशी अनेकवेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार २४ जून पिडीत महिलेने शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली.

आरोपी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लैंगिक शोषण करीत आहेत व या गोष्टीची वाच्यता केल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देतात असेही तक्रारीत म्हटले आहे. तर महिला आणि आरोपीचे अनेक दिवसांपासून सबंध असल्याची माहिती आहे.

सदरच्या फिर्यादी वरुन आरोपी अशोक अग्रवाल व किशन अग्रवाल या दोघांविरुद्ध ३७६, ३७६ (२) (के) ३५४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपक इंगळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here