मूर्तिजापूर । लाखपूरी सर्कल मध्ये पार्सलचा पैशाचा पाऊस?…

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुका स्थगित जरी झाल्या असल्या तरी मात्र लाखपुरी सर्कल मध्ये उमेदवार ऍक्टिव्ह आहेत. याच मतदार संघात करोडो रुपयांची संपत्ती असलेले एक फेकू उमेदवार आहेत. एखाद्या मंत्र्याप्रमाणे ठराविक दौरे आयोजित करून गोरगरीब वस्तीत जातात तेथे एक दोन कार्यकर्ते अगोदरच गरिबांना सांगून ठेवतात, भाऊ तुम्हाला लखोपती बनविणार, भाऊ ने मागील मतदार संघात करोडोरुपयांचे काम केले, अनेकांना लखोपती केले ,आता तुमची बारी आलीय असे सांगून मदतीच्या आश्वासनाचे गाजर देवून मोकळे होतात.

दिवसभर दौरे आटोपल्यावर रात्री बैठकीत आपली कोण कोणत्या गावात हवा आहे कार्यकर्त्यांना मेजवानी देत माहिती घेतात. श्रावण लागायला अजून वेळ असल्याने कार्यकर्ते हि या संधीच सोने करीत असताना रोज दिसत आहे. भाऊचा सध्या लाखपूरी सर्कलवर अतोनात खर्च सुरु आहे आहे. कारण आता आचारसंहिता किंवा हिशोब देण्याची चिंता नसल्याने आता काळजी नाही. सर्कलच्या कोणत्याही गावातील असो त्याच्या देवस्थानाला भाऊ आश्वासन देवून मोकळे होतात.

या भागातील शेतीची कामे आटोपल्याने बरेच कार्यकर्ते खाली असल्याने तेही भाऊच्या सोबतच आहेत मात्र मत दुसर्याला देणार आहेत असेही कार्यकर्ते भाऊ सोबत आहेत. भाऊच्या आजुबाजुवाले तेही संधीचा भरपूर फायदा घेत आहेत. निवडणूक पूर्वी जे जे साध्य होत असेल तो ते घेण्याचा प्रयत्न करीत आहे. भाऊ हा एवढा सोंगाड्या आहे की यावेळी तो तुम्हला सांगणार….मी तुमच्या रक्ताचा आहो…मलाच तुम्हीं निवडून द्या, मी अर्ध्या रात्री तुमच्या कामी येईल…मागील मतदार संघात मी आमदारापेक्षा जास्त कामे केली….मग एवढी कामे जर तुम्ही असेल तर मागील मतदार संघात का हारले? असा प्रश्न विचारण्याच्या मानसिकतेत काही मतदार आसल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे….(क्रमशः)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here