मूर्तिजापूर (प्रतिनिधी) रविवार दि २७ रोजी स्थानिक अग्रसेन भवन प्रांगण मध्ये संपन्न झालेल्या एका सभेत सोशल डिस्टंसिंग चे पूर्णपणे पालन करून झालेल्या मीटिंगमध्ये शहरातील लहान-मोठे सर्व किराणा व्यवसायिक, धान्य अनाज विक्रेता, डेली नीड्स तसेच गोळी बिस्किट कन्फेक्शनरी विक्रेता यांच्या सर्व समन्वयक बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सर्वानुमते पुढील दोन वर्षा करिता कार्यकारिणीची निवड करण्यात आलेली आहे.
या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष पदाकरिता रिंकू अरोरा उपाध्यक्ष इब्राहीम भाईघानीवाला उपाध्यक्ष राहुल महाजन सचिव विजय हुन्दानी सहसचिव भूषण सोमानी कोषाध्यक्ष मनोहर निमोदिया सहकोषाध्यक्ष दीपक हुन्दानी प्रसिध्दि प्रमुख अंकुश अग्रवाल तसेच मार्गदर्शक सल्लागार म्हणून अरविंद श्रीराम पटेल,लक्ष्मण राजपाल, नूपेन कुमार बाबु भाई पटेल,राजेश सारानी, कैलास साबू इत्यादींची निवड करण्यात आली.
सदर सभेमध्ये ज्येष्ठ व्यवसायिक रामकुवार लाहोटी ,राम दर्याणि यांच्या मार्गदर्शना मध्ये आयोजित करण्यात आली होती. सभेचे प्रस्तविक मध्ये मूर्तिजापुर शहरातील व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी बघून व्यापाऱ्यांचे संघटन तयार करणे अत्यंत जरूरी असल्यामुळे आजच्या या सभेत उपस्थित व्यापाऱ्यांच्या सहमतीने कार्यकारणीची निवड करण्याचे तसेच
एक माहितीपत्रक द्वारे सर्व व्यापारी बंधूं ची माहिती डाटा स्वरूप मध्ये जमा करण्यासाठी देण्यात आलेले फॉर्म ला भरून देण्याचे आव्हान चंदन अग्रवाल यानी केले , तर आभार आनंद बांगड यांनी मानले.किराना खाद्य विक्रेता संघ पाठोपाठ कपडा होजिअरी, कटलरी ,स्टेशनरी, हॉटेल, रेस्टारेंट,
अशा विविध व्यवसायिक संघाचे स्थापन करून सगळ्या संघाची मिळून तालुकास्तरीय एक व्यापारी महासंघ तयार करण्याचा मानस आपल्या संचलन मधून अशोक भावनांनी यांनी व्यक्त केला पुढील काही दिवसातच सर्व व्यापाऱ्यांची अलग बैठका घेऊन त्यांची कार्यकारिणी निवड करण्याचे सुद्धा या सभेमध्ये ठरले.