मूर्तिजापूर | तत्कालीन जिल्हा परिषद सदस्याच्या नाकर्तेपणामुळे शेंद ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत नरक यातना…पाहा व्हिडिओ

मूर्तिजापूर तालुक्यातील पूर्वी हातगांव जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या शेंद ते कानडी रस्त्याची अत्यन्त दयनीय अवस्था झाली असून गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल साचल्याने विद्यार्थ्यांना कानडी येथे शिक्षण घेण्यासाठी रोज पाच किलोमीटर चिखल तुडवत शाळेत जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानासह हाल होत आहे.

तालुक्यातील कानडी शेंद रस्त्याची स्थिति अतिशय दैनिय असून पाच किलोमीटर रस्ता अगदी कच्चा आहे. हा रस्ता काट्या – गोट्यांनी भरलेला असल्याने पिवसाळ्याच्या दिवसात या रस्त्याने पायी चालणे कठीण झाले आहे. सदर रोड हा जिल्हा परिषद च्या अंतर्गत येत असल्याने यापूर्वी असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या नाकर्तेपणामुळे या रोड कडे लक्षच दिलं नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या रोडबाबत अनेक तक्रारी सुद्धा केल्या आहेत. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे लक्षच दिले नाही.

शेंद येथील अनेक विद्यार्थी माध्यमिक शिक्षणासाठी कानडी येथे येतात परंतु कानडी ते शेंद या पाच किलोमीटर रस्त्याची अतिशय दैनिय अवस्था झाली असल्याने या रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. शेंद या गावाला रस्ताच नसल्याने हे गाव दुर्गम भागात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. येथील नागरीक किराणा, बाजार, औषधी, दवाखाना यासाठी चिखल दुडवत कानडी येथे येतात येवढेच नव्हे तर येथील विद्यार्थ्यी शिक्षणासाठी कानडी येथे रोज येत असल्याने त्यांना पाच किलोमीटर चिखल तुडवत यावे लागते यामुळे ते शाळेत वेळेवर पोहोचू शकत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायत कानडी व गट ग्रामपंचायत कव्हळा शेंद यांनी संबंधितांना विविध निवेदने देऊनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. नुकतेच पालकमंत्र्यांनी जाहीर केल्या प्रमाणे या संपर्क रस्याचे काम तातडीने हाती घ्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.. जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या या रस्त्याकडे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्याने लक्ष न देता नाकर्ते पणाची भूमिका घेतल्याने शेंद येथील ग्रामस्थांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here