मूर्तिजापूर | सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अण्णा बोनगिरे यांना जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे जामीन मंजूर…

फोटो- सांकेतिक

प्रकाश अण्णा बोनगिरे यांना न.प.मूर्तिजापूर येथील शासकीय अभियंत्यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयातर्फे जामीन मंजूर केला आहे.

सदर गुन्ह्याची हकीकत अशाप्रकारे आहे की पोलीस स्टेशन मुर्तीजापुर शहर येथे फिर्यादी संकेत आनंद तालकोकुलवार (अभियंता नगर परिषद कार्यालय मुर्तीजापुर) यांनी दिनांक 05/10/2021 रोजी प्रकाश बोनगिरे यांच्याविरुद्ध तक्रार दिली की फिर्यादी हे आपल्या कंत्राटदारांना रस्त्याचे लेआउट समजावून सांगत असताना यातील नमूद आरोपी प्रकाश बोनगिरे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला व तसेच फिर्यादी यांना लोटपोट केली व त्यांचा हात पिरगळला तसेच त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय वस्तूंची नासधूस केली अशा फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे प्रकाश बोनगिरे यांचे विरुद्ध भादंवि चे कलम 353, 332, 294, 504, 506, 427, 186 अंतर्गत अपराध क्रमांक 420/2021 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर प्रकरणामध्ये प्रकाश बोनगिरे यांना दिनांक 07/10/2021 रोजी मूर्तिजापूर पोलिसांनी अटक केली व त्यांना अकोला येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले.
सदर अटकी विरुद्ध प्रकाश बोनगिरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालय येथे दिनांक 9/10/2021 रोजी जमानत अर्ज दाखल केला

सदर जमानत अर्जास मुर्तिजापूर येथील पोलीसांनी हरकत घेऊन न्यायालयात कथन केले की, सध्या मूर्तिजापूर येथे मुख्य रस्त्याचे बांधकाम चालू असून सदर आरोपी सुटल्यास शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याची शक्यता आहे, नमूद आरोपीस जामीन दिल्यास तो अशाच प्रकारचा गुन्हा पुन्हा करू शकतो त्याचप्रमाणे प्रकाश बोनगिरे यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून त्यांना जामीन दिल्यास जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणण्याची दाट शक्यता आहे तसेच पोलिसांनी असेही कथन केले की आरोपीचा जामीन झाल्यास जनमाणसात चुकीचा संदेश जाऊन इतर लोकांत अशा प्रकारचा गुन्हा करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते वरील सर्व कारणास्तव सरकारी पक्षाने प्रकाश बोनगिरे यांचा जामीन नाकारण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला केली.

आरोपीचे वकील यांनी न्यायालयात सांगितले की सरकारी पक्षाचे म्हणणे हे सत्यास धरून नसल्याने ते असत्य व खोटे आहे. प्रकाश बोनगिरे हे एक समाजसेवक असून त्यांचे कुठलेही क्रिमिनल रेकॉर्ड आज पर्यंत सुद्धा नाही. आरोपीस सदर केसमध्ये खोटे फसविले गेलेले आहे, परत न्यायालयास सांगितले की नगरपरिषद विरुद्ध प्रकाश बोनगिरे यांनी अनेक तक्रारी केलेल्या असून त्याचा वचपा काढन्या करिता बोनगिरे यांना या केसमध्ये खोटे अडकविण्यात आलेले आहे. आरोपींच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितले की सदर गुन्ह्याच्या तपास कामी आरोपीच्या कष्टडी ची आवश्यकता नसल्याने त्यांना जामिनावर सोडण्यात यावे व गुन्ह्याच्या संबंधित इतरही अनेक महत्त्वाच्या बाबींकडे आरोपीचे वकील यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालयाने दि. 11/10/2021 रोजी प्रकाश बोनगिरे यांना जामिनावर सोडण्याचा आदेश पारित केला.
सदर प्रकरणात प्रकाश बोनगिरे यांच्या बाजूने ॲड. सचिन वानखडे यांनी यु्तिवाद केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here