मूर्तिजापूर | रानडुकरांच्या हल्ल्यात हात,पाय निकामी झालेल्या युवा शेतकऱ्याची आर्थिक मदतीची मागणी…

मूर्तिजापूर – शेतात मोटरसायकल ने जात असलेल्या युवा शेतकऱ्यांवर अचानक रानडुकरांनी हल्ला केलाय या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याने एक पाय,एक हात पूर्णपणे निकामी झालाय, शेतकऱ्या जवळ उपचारासाठी पैसे नसल्याने शेतकरी हतबल,वनविभागाकडे शेतकऱ्याची आर्थिक मदतीची मागणी.

मूर्तिजापूर स्टेशन विभागातील सराफा लाईन येथे राहणारे 27 वर्षीय युवा शेतकरी ज्ञानेश्वर दिवाकर गावंडे हे दिनांक २६ जून ला शेतात पेरणीसाठी सालतवाडा येथे मोटरसायकल ने जात असताना शेतशिवारात त्यांच्यावर अचानक तीन चार रानटी डुकरांनी हल्ला चढविला असता ज्ञानेश्वर हे गाडीवर खाली पडले असता डुकरांनी त्यांच्या पायाला आणि हाताला मोठ्या गंभीर जखमा केल्यात

तर यात पायाला,हाताला मोठं फॅक्चर झाल्याने त्यांचा उजवा पाय आणि उजवा हात पूर्णपणे निकामी झाला असल्याने त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचे सांगितले असून ऑपरेशन ला एक लाखांपेक्षा जास्त खर्च येत असल्याने शेतकरी मोठा हतबल झालाय.


लॉक डाऊन आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यावर आणखी आर्थिक संकट कोसळल्याने शेतकऱ्यापुढे मोठं संकट उभं झालं आहे. शेतकऱ्याने रानडुकरांचा बंदोबस्त करावा,तसेच शेतकऱ्याचा ऑपरेशन चा खर्च देण्यात यावा मागणी वनविभागाकडे करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here