मूर्तिजापुर | दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बचत गटाना कर्ज मंजूरी आदेशाचे वितरण…


मूर्तिजापुर – दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत दारिद्र्य रेषे खालील व (सामाजिक आर्थिक सर्वेक्षण) या यादि मधील पात्र अल्प उत्पन्न गटातील स्थापित नऊ बचत गटाना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मूर्तिजापुर यांचे वतीने प्रत्येकी रु. दोन लक्ष इतके व्याजा वरील अनुदानित कर्ज मंजूर करण्यात आले असून मंजूरी आदेशाचे वितरण आज नगर परिषद प्रांगना मधे ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर मा.आमदार हरीष भाऊ पिंपळे , नगराध्यक्षा मोनालिताई गावंडे, बँक ऑफ महाराष्ट्र चे हेड कैशियर नरेश लवंगे यांचे हस्ते वितरित करण्यात आले .

यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत डाबेराव, महिला बालकल्याण सभापति प्रतीक्षा मोहन वसुकार, बांधकाम सभापति कविता राहुल गुल्हाने, नियोजन सभापति ममता कैलाश महाजन,मंदाताई जळमकर, धनश्री भेलोंडे, स्नेहा गजानन नाकट, लक्ष्मी देवीदास गोळे ,सरिता राहुल पाटिल, अफरोज़ा बी अ. कलाम, मनुबाई तानकर, सर्व नगरसेविका ,भारत जेठवानी, सचिन पावड़े, द्वारकाप्रसाद दुबे, सुनील पवार, रविन्द्र इंगळे, वैभव यादव , तस्लीमखा बिस्मिल्लाखा नगरसेवक पदाधिकारी व समाजसेवक कमलाकर गावंडे, नासीरुद्दीन , शेख इमरान शेख खलील , शहरातील गणमान्य अतिथि उपमुख्याधिकारी अमोल बेलोट, कार्यालय अधीक्षक निशिकांत परळीकर , या अभियानाचे सहायक प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल , समुदाय संघटिका रुबीना मॅडम, माविम च्या नंदिनी राऊत, शिल्पा बोकडे बचत गटांचे अध्यक्ष सचिव व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

या अभियाना अंतर्गत महिलांचे एकूण 185 बचत गट स्थापित असून त्यांना व्यवसाय मार्गदर्शन व महिला सक्षमीकरण करण्याचे दृष्टिने व्यावसायिक प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभारणी अंतर्गत व्यवहार करिता राष्ट्रीयकृत बँक कडून व्याजावरिल अनुदानित कर्ज उपलब्ध करुण देण्यात येत असल्याचे व मूर्तिजापुर येथील सर्वच बैंका चे सहकार्य लाभत असल्याने महिला आपल्या कुटुंबा साठी आर्थिक हातभार लावत आपले लघुउद्योग उभारणी करत भरारी घेत असल्याचे यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी सांगितले.

सदर अभियान यशस्वी करण्या करिता मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले, सदर बचत गटाना लवकरच त्यांचे बँक खात्या मधे कर्जा चे वितरण करण्यात येत असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक सुमित धुमाळ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जयदीप सोनखासकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here