मूर्तिजापूर | महामारीचे संकट दूर करण्यासाठी सिधी बांधवाचा अखंड जप…

मूर्तिजापूर – कोरोना महामारीचे रुपात आलेले संकट नष्ट करण्यासाठी मुर्तीजापूर (महाराष्ट्र) येथील १०० सिंधी बांधव श्री सुखमणी साहिब जी आणि श्री जपुजी साहिब जी यांचा जप करीत आहेत, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 24 तासापासून सतत जप चालू आहे.

अमृतवेला ट्रस्टचे संस्थापक श्री गुरप्रीतसिंग जी (रिंकू विरजी) यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण भारत आणि जगभरातील 500 केंद्रांवर हा जप केला जात आहे.
श्री गुरु नानक देव जी यांचे स्वरूप, श्री गुरुग्रंथ साहिब जी, श्री सुखमणी साहिब आणि श्री जपुजी साहिब यांचे अखंड पठण होत आहे.

मूर्तिजापूर येथील श्री लक्ष्मीलीला भवन, सिंधी कैम्प येथे 43 दिवस या केंद्रात अखंड जप चालू राहील, हा जप 13 जून पर्यंत सुरू असणार आहे. या केंद्रावर 4 साधक सतत 1 तास जप करीत असतात.

या उपक्रमाला भव्य यश मिळविण्यासाठी अमृतवेला ट्रस्ट मूर्तिजापूर (महाराष्ट्र) चे श्री बंटी बालाणी, श्री बंटी जी, श्री. लालाजी टिकयाणी, श्री. विक्की सदरंग, श्री महेश भवानी, श्री शंकर काशवानी आदि समाजसेवक परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here